Uncategorized

कलापुष्प प्रतिष्ठान ची मागणी.

नळाला पाणी दया, अन्यथा पाणीपट्टी रद्द करा.

कलापुष्प प्रतिष्ठानची मुख्याधिकार्याकङे निवेदनाद्वारे मागणी

अहमदपूर : (प्रतिनिधी विनय ढवळे)
सध्या सर्वत्र दुष्काळ असून पाण्यासाठी नागरिकांचे बेहाल होत आहेत.अशातच अहमदपूर शहराला 30 ते 35 दिवसातून एक वेळेस नळाला पाणी येत असल्याने जनता त्रस्त झाली आहे.शहरावर मोठे पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.नगर पालिका वेळेवर पाणी देत नाही पण सक्तीची वसूली मात्र करते तेंव्हा पाणी नाही तर पाणीपट्टी नाही असा सवाल नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.म्हणूनच या वर्षी पाणीपट्टी रद्द करावी व शहरातील प्रत्येक प्रभागात पाण्याचे टॅंकर मार्फत पाणी पुरवठा करावा अशी मागणी कलापुष्प प्रतिष्ठानच्या वतीने मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनावर अध्यक्ष चंद्रशेखर भालेराव अजहरभाई बागवान अशिष तोगरे शेख दस्तगीर पापा आय्या पाशाभाई शेख रवि मद्रेवार प्रा.राजरत्न वाघमारे इंजी संदीप शिंगाङे यांच्या स्वाक्षर्या आहेत.

Comment here