Top News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त्य डिजिटल अभिवादन !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त्य  www.brambedkar.in या  वेबसाईट चा लाभ घ्यावा असे आव्हान त्रिरत्न युवा मंच संस्थे च्या वतीने करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या या संकेत स्थळाला आज पर्यंत लाखों अनुयायांनी भेट देऊन लाभान्वित झाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीची सर्वच माहिती जसे त्यांचे दुर्मिळ फोटोज, व्हिडीओज, सॉंग्स, ई-बुक्स, धम्मा आणि विपश्यना विषयी माहिती माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आंबेडकरी चळवळ साता समुद्रा पल्याड पाहोंचवण्यासाठी चे महान असे कार्य या आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनियेत अविरत चालु आहे. कसल्याही अडचणीची पर्वा न करता आंबेडकरी चळवळीचे डिजिटायझेशन करण्याचे कार्य मोठया जोमाने संस्था करीत आहे. 

ह्या कार्यात सामाजिक चळवळीत कार्य करणारे अनेक भीम सैनिक सहभागी आहेत. प्रेमसागर गवळी, ऍड. रवी जाधव पाटील, दिपक सूर्यवंशी, सत्यशील गायकवाड, ऍड. पुनम खेडकर, पत्रकार मिलिंद कांबळे व इतर सहकारी … 

तरी तमाम आंबेडकर अनुयायांनी www.brambedkar.in ह्या डिजिटल वेबसाईट ला आजच भेट द्यावी असे आव्हान संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे. 

Comment here