Top News

मानवत येथील गुंड पृवृत्तीचा बंदोबस्त करा

मानवत येथे गुड प्रवृत्तीचा बंदोबस्त करा

मानवत  (महावार्ता न्यूज): हरांमध्ये मागील काही वर्षापासून गुंड व समाजविघातक प्रवृत्ती सातत्याने वाढत आसल्याने शहरात व्यापार ,व्यवसाय करने अवघड झाले आहे यामुळे या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करुन मानवत शहर भयमुक्त करावे अशा मागणीचे निवेदन मानवत येथील वैद्यकीय व्यावसायीक यांनी दि.२० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मानवत  शहरांमध्ये मागील पाच वर्षापासून गुंड व समाजविघातक प्रवृत्ती सातत्याने वाढत चालली आहे मानवत शहर हे एकेकाळी व्यापाराचे विविध क्षेत्रातील व्यावसायिक व उद्योजक व सुशिक्षित सुजाण नागरिकाचे शहर असा नावलौकिक प्राप्त होता तेव्हा शहरांमध्ये गुंड प्रवृत्तीस थारा  नसल्याने व्यापार उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत वेगाने भरभराटी झाली होती परंतु मागील पाच वर्षापासून काही ठराविक अशा गुंड आणि समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांमुळे व्यापारी व उद्योजक तसेच व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण शहरांमध्ये निर्माण झाले आहे यात  सतत वाढ होत आहे या भीतीयुक्त वातावरणामुळे नवीन व्यापारी उद्योजक  शहरांमध्ये कुठल्याही नवीन व्यापार किंवा उद्योग येण्यास उत्सुक नसल्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास खुंटला आहे यामुळे आम्ही सर्व मानवत येथील वैद्यकीय व्यवसायिक या गुंडगिरीचा निषेध नोंदवून यावर जिल्हा सामान्य प्रशासनाचे योग्य ती कारवाई करावी या विषयी निवेदन देत आहोत आपण याची त्वरित दखल घेऊन पोलिस प्रशासनाला योग्य ते निर्देश द्यावे असे निवेदनात नमूद केले आहे निवेदनावर डॉ.सचिन कदम, डॉ.जगदिश शिंदे ,डॉ.किरण कडतन,डॉ.विठ्ठल काळे,डॉ.योगेश तोडकरी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Comment here