Breaking News

वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम वाचनालयास पुस्तके भेट…

डॉ . निनाद दगडु यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट

मानवत प्रतिनिधी
( इरफान बागवान ) व्यक्तीमत्वानी आपल्या आयुष्यात मोठे कार्य केले त्यांच्या आयुष्यात वाचनाने खुप मोठे महत्व होते असे प्रतिपादन नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांनी जागतिक पुस्तक दिनाच्या आयोजन कार्यक्रमावेळी केले.
जागतिक पुस्तक दिन व डॉ. निनाद दगडु यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.नेत्रदीप दगडु चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने साने गुरुजी वाचनालयास ११ हजार रुपयाचे ग्रंथ भेट देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून के.के.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, प्राचार्य नागनाथ कदम, वाचनालयाचे अध्यक्ष संजय लड्डा, डॉ. निनाद दगडू हे उपस्थित होते .यावेळी प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांनी ग्रंथवाचनाचे महत्व विशद केले.
या कार्यक्रमास डॉ. नेत्रदीप दगडु चॅरिटेबल ट्रस्ट चे गणेश मोरे, विशाल कडतन,सत्यशिल धबडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Comment here